आपण देत असलेली सेवा व उत्पादने इंटरनेटवर झळकलीच नाहीत, तर ग्राहकसंख्या वाढणार कशी?
नमस्कार, मी ए. के. पाटील, उर्फ एकेपीफाईवनव्ही. उद्योगवाढीसाठी तसेच प्रशासकीय योजना गावोगावी पोहचविण्यात इंटरनेट अथवा आंतरजाल मोलाचे योगदान देऊ शकते. परंतु आजसुद्धा अनेक लघुउद्योजकांत व सरकारी योजना राबविणाऱ्यांत डिजिटल काँटेंटच्या क्षमतेविषयी एकतर अनास्था असते, किंवा काही महत्त्वपूर्ण काँटेन्ट मार्केटिंग पूर्वनियोजन पद्धती न वापरता परस्पर ब्लॉग प्रकाशित केले जातात.
कधी कृत्रिम बुद्धिमत्ता (ए. आय.) वापरुन, तर कधी जीवनातील अन् काम करतेवेळी आलेल्या भल्याबुऱ्या अनुभवांशी निगडीत काँटेन्ट जगापुढे मांडण्यात मी आपणांस योग्य ते मार्गदर्शन करू शकतो. अगदी प्रत्यक्ष सहकार्यदेखील करू शकतो.
मी सध्या एक बहुराष्ट्रीय आय. टी. कंपनीत काँटेन्ट मार्केटिंग व संबंधित टेक्निकल जबाबदाऱ्या पार पडतो. २०१९ पूर्वीपासूनच या स्वरूपातील कामांचा दांडगा अनुभवप्राप्त Akp51v आपणांस दर्जेदार इंग्रजी व मराठी काँटेन्ट मार्केटिंग सेवासुविधा आणि कौशल्यविकास देण्यास सुसज्ज आहे.

काँटेन्ट मार्केटिंगला प्रोत्साहन
Akp51v सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSMEs) त्यांची ऑनलाइन प्रतिमा विकसित करण्यासाठी काँटेन्ट मार्केटिंगमधील मुख्य संकल्पना क कार्यपद्धती त्यांच्या ब्लॉगमधून अथवा अन्य संपर्क समजावून सांगतात. प्रत्येक मार्केटर, ब्लॉगर किंवा काँटेन्ट विशेषज्ञाने विचारात घ्यावयाच्या गोष्टींचा थोडक्यात अंदाज घेण्यासाठी खालील मुद्दे विचारात घ्या:
प्रेक्षकवर्ग व औपचारिकतेचे प्रमाण यांना साजेसे स्टाइल गाइड अथवा लेखन मानक बनवा.
व्यक्तिगत ब्लॉगमध्ये आपण अधिक मुक्तपणे हवी ती वाक्ये व उदाहरणे वापरू शकता. परंतु उद्योगवाढीसाठी वेबसाइट वापरताना फॉर्मल किंवा खूपच क्लिष्ट न् प्रमाणित समजले जाणारे शब्द वापरावे लागू शकतात.
खूप पूर्वी लिहिलेली साहित्यसामग्री (काँटेन्ट) विवध सोशल किंवा ऑनलाइन व्यसपीठांवर पुन्हा थोड्या वेगळ्या स्वरूपात वितरित करा.
तुम्ही काही महिन्यांपूर्वी (अगदी काही वर्षांपूर्वी) निर्माण केलेले काँटेन्ट नमुने इतरत्र पुनर्प्रकाशित करण्यात गैर काहीच नाही. कारण तुमचे सध्याचे व नवीन प्रेक्षक अन् ग्राहक कदाचित जुन्या काँटेन्टविषयी अनभिज्ञ अपरिचित असतील.
प्रत्येक विपणन (मार्केटिंग) नीतीचा मूलाधार म्हणजे सातत्य आणि ते सुनिश्चित करण्याकरिता लागते काँटेन्ट कॅलेंडर.
हिरवे चिन्ह असणाऱ्या एक्सेल फाइलमधूनच मोठ्यात मोठ्या कंपन्या कामांचे नियोजन करतात. त्याच धर्तीवर उद्योजक व संस्थानी तारीख, पब्लिश करायची ब्लॉग पोस्ट, संबंधित व्यक्ती, आणि एकूण लागणारा वेळ तपसावेत.
विविध कौशल्ये आत्मसात करण्यासाठी मोफत असणारे नसणारे पर्याय वापरा.
सर्व काँटेन्ट स्पेशलिस्ट, ब्लॉगिंग करणारे, आणि विडियो निर्मितीतून स्वतःची ऑनलाइन ओळख बनवणारे काँटेन्ट क्रिएटर यांना सर्च इंजिन ओप्टिमैजेशन म्हणजेच SEO साठी आवश्यक मुख्य तंत्राची जाणीव असावी. तसेच, सोशल मीडिया मार्केटिंग मधील प्रत्येक साइटवरील योग्य रीतीने पोस्ट टाकण्याविषयी ज्ञान असावे.
एकट्यानेच सगळे काही करण्याचा अट्टहास टाळा. इतरांची मदत घेऊन नियोजन करा.
अधिक अनुभवी काँटेन्ट स्पेशलिस्ट यांच्याशी संपर्क साधून सल्ले घ्या. जास्त किचकट प्रोजेक्ट पार पाडण्याकरिता इतरांना मोबदला देण्याची तयारी ठेवा. सारख्याच क्षेत्रात काँटेन्ट निर्मिती करणाऱ्यांशी संवाद, नेटवर्किंग, व पार्टनर्शिप वाढवा.
एकदम डझनभर प्रोफाइल व वेबसाइट सांभाळू नका. मुख्य प्रेक्षकवर्ग जिथे असेल, तिथे लक्ष केंद्रित करा.
आपल्या ब्रँडशी निगडीत अनेक प्रोफाइल बनविण्यात गैर काहीच नाही. पण त्या सर्व प्रोफाइल दर रोज अपडेट करण्याच्या मागे लागू नका. ग्राहकांचे वयोगट, राहणीमान, मासिक उत्पन्न, शिक्षण, इ. तसेच आपण नेमके कुठले उत्पादन (किंवा सेवा) कुठल्या प्राइस रेंजमध्ये विकत आहात, ते कोण उत्साहाने विकत घेऊ शकेल, या मुद्दयांनुसार कुठली प्रोफाइल जास्त महत्वाची ते ठरवा.
ऑनलाइन जाहिरातीवर खर्च करावा का?
एक प्रश्न गूगळे मास्तरांना, म्हणजेच Google ला विचारला, की कित्येक लाख वेबसाइट सापडतात. आता तर त्या वेबसाइट चेक करण्याची तेवढी गरजच नाही, कारण ए. आय. मार्फत संबंधित सारांश तात्काळ दिसतात. अर्थात, उत्तम दर्जाचे लेखन आणि पारंपारिक SEO यांना आजदेखील महत्व आहेच. त्यांचाच आवाका वाढून आधुनिक मार्केटिंग विश्वात AEO आणि GEO अधिक तातडीच्या पद्धती बनल्या आहेत.
परंतु, वरील सर्व मोफत प्रेक्षक मिळवण्याचे मार्गे आहेत. उद्योगांना त्यासाठी कित्येक वर्ष वेबसाइट व सोशल मीडिया प्रोफाइल यांवर प्रचंड मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे ऑनलाइन जाहिरातीसुद्धा आवश्यक असतात. आपण एक विशिष्ट रक्कम, प्रदेश, व प्रेक्षक निवडीचा निकष ठरवून स्वतःच्या वेबसाइट आणि सेवा-उत्पादने यांच्या जाहिराती ऑटोमॅटिक करण्यासाठी, Google, Meta Business Suite, आणि LinkedIn यांचा आधार घेऊ शकता.
आधी छोट्या बजेटमध्ये किती प्रेक्षक मिळू शकतात आणि त्यांच्याकडून आपण किती मागणी व प्रॉफिट मिळवू शकता, या गोष्टींचा अभ्यास करा. त्यानंतर हळूहळू बजेट वाढवत न्या. जाहिराती करताना विविध सोशल मीडिया पोस्ट आणि डिझाईन यांच्या रचनेत बदल करून बघायचे असते. आपण बनविलेल्या जाहिरातीसाठी त्यात्या वेबसाइटवरील मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करायचे असते. एकूण खर्च व त्याद्वारे प्राप्त प्रेक्षक, यांचा रेकॉर्ड ठेवायचा असतो. त्यात अचानक सकारात्मक किंवा तीव्र नकारात्मक बदल झाल्यास, संभाव्य समस्या शोधाव्या लागतात.
Akp51v Web App
- Explore Akp51v.com like an installed app using browser features.
- Load a cached version of the website in the regions with poor connectivity.
- Launch the app in a true full-screen mode.


Upcoming Features
- E-commerce capabilities for digital products and services.
- Faster website loading.
- Comprehensive guides (blog series) on all ins and outs of content marketing.
- Multilingual site features, mainly Marathi and Hindi, are also under consideration.
“Content builds relationships. Relationships are built on trust. Trust drives revenue.”
Andrew Miles Davis
Keynote Speaker, Content Marketing Trainer
Watch, Read, Listen
Stay Informed
Get email-only content, featuring summaries of new posts, recommendations, and more.
Note: The following email list builder is currently paused. It will be re-activated once available.